आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 4

  • 6.9k
  • 2.6k

तारीख एकवीस डिसेंबर संपून बावीस डिसेबर सुरु (मध्यरात्र) : पात्र क्रंमाक दोन = तुम्ही आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा एक खून करणार, आपल्या हातून एका जिवंत माणसाचं आयुष्य संपणार, आपण खून करणार, काय फिंलिग आहे, त्यांने जन्माला यायचं आणि एकूण जगण्याचा प्रवास सुरु करायचा आणि कुठूनतरी तुम्ही त्यांच्या समोर उभे राहणार आणि आणि…. ढिंशक्यावं….. सकाळी उठून तडक खून करायचायं आणि डायरेक्ट गायब, कायतरी तुमच्या मनाचं आतल्या आत चाललं होत…. आणखी एका मनाशी, मनातून काहीतरी बाहेर पडू पाहत होतं, काय बरं ते, प्लॅन फिसकटला तर…… ऐन निवडणुकीच्या काळात पकडलो गेलो तर, पोलिसांनी तुडवतुडव तुडवला तर….. भाऊंनी मग अडचण नको म्हणून आपलाच गेम