आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 7

  • 8.7k
  • 2.6k

समाप्त............ आज इतकी वर्ष उलटून गेली पण या खूनाचा आरोपीच सापडला नाही, पोलीस रेकार्डला कुणाचंच नाव नाही, सुमेधच्या घरांच्यानी, नातेवाईकांनी, एरियातल्या लोकांनी कोणताही प्रयत्न केला नाही. आता तिथं भाऊचीं एक हाती सत्ता आहे, शहरातला कोणताही नवा प्रोजेक्ट भाऊंच्या संमतीशिवाय पुढे जात नाहीत, आता फोटोशापचा वापर करत भाऊंचा आणि योगीचा एकसंध फोटो झळकवलाय बॅनरला….. ********** बौधिक: सामान्या जनता, आळस आणि गैरसमज अंनत फंदी यांच्या “बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गं सोडू नको” किंवा “ठेविले अनंते तैसेची रहावे” या तुकोबाच्या ओळीचा आधार घ्यावा लागण्याइतपत परिस्थिती खालावलीय, आळशीपणामुळे प्रगती थांबते ही सगळी थोंताड आहेत, इतर सुविचार संपले की आम्ही