लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ३)

(11)
  • 10.5k
  • 1
  • 5.3k

नैनाने डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली .. “सकाळी ११.०० वाजता “वर्ल्ड मनी” बॅकेचे जी.एम. येणार आहेत. आपण हाताळत असलेल्या नविन ऑटोमोबाईल प्रोजेक्टचे सर्व व्यवहार त्यांच्या बॅकेमार्फत व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे आणि त्याबाबत आपणास बॅक देऊ करत असलेल्या सुविधांबद्दल आणि इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी ते येणार आहेत. ह्या… ” “मिटींग कॅन्सल कर.. ” रोशनी म्हणाली. “.. पण मॅडम, श्री अविनाश वर्मा त्या बॅकेचे जि.एम आहेत आणि..” “नेक्स्ट.. ” रोशनी म्हणाली.. “ओ.के मॅम.. १२ वाजता ‘कुल इंटीरेअर्स’ च्या मिस् भावना प्लॅंन्टच्या इंटेरिअर्सचे फायनल ड्राफ्ट्स घेउन येणार आहेत…”, नैनाने एक प्रश्नार्थक नजर रोशनीकडे टाकली आणि पुढे वाचायला सुरुवात केली.. “१.३० वाजता