समोरच्या बेडवर एक तरूणी अस्ताव्यस्त स्थीतित मृत अवस्थेत पडली होती. तिच्या डोक्यातुन रक्ताचा पाट वाहत जमीनीवर पसरला होता आणि जोसेफ त्यामध्येच उभा होता. त्याचे लक्ष हातातल्या लोखंडी रॉडकडे गेले जो त्या तरूणीच्या रक्ताने माखला होता. ह्याच रॉडने त्या तरूणीचा खुन झाला होता हे कुठलंही शेंबड पोरगं सांगु शकले असते. भिंतीवर दिव्याच्या बटनांचा शोध घेताना लागलेले रक्ताने माखलेले जोसफच्या हाताचे ठसे विखुरले होते. हा सर्व प्रकार पाहुन जोसेफ भांबावुन गेला. त्याने तो रॉड टाकुन दिला आणि तो सावकाश त्या तरूणीपाशी गेला. हळुवार त्याने त्या तरूणीचा चेहरा वळवला आणि नकळत त्याच्या तोंडुन उद्गगार बाहेर पडले…”सोनी!!!” आश्चर्याचा, भितीचा तो धक्का सावरत होता तोच