लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ११)

(11)
  • 10.1k
  • 2
  • 4.2k

“गुड मॉर्नींग डार्लींग..” जोसेफने डोळे उघडले तेंव्हा चक्क समोर नाईट-ड्रेसमध्ये रोशनी चहाचा ट्रे घेउन उभी होती. खिडकीतुन येणार्‍या कोवळ्या सुर्यप्रकाशात पांढर्‍या सिल्कचा नाईटड्रेस घातलेली रोशनी क्षणभर जोसेफला एखाद्या छोट्याश्या परीसारखी भासली. “गुड मॉर्नींग डीअर..”, उठुन बसत जोसेफ म्हणाला “चल पटकन तयार हो, आणि दिवसांतली कामं संपवुन टाक..”, रोशनी म्हणाली.. “का? काय झालं?”, जोसेफ “अरे का काय? संध्याकाळी जायचे आहे ना पार्टीला संध्याकाळी. मला कुठलीही कारणं नक्को आहेत बरं का..”, लटक्या रागाने रोशनी म्हणाली…”आयुष्यात मी खुप पार्टीज मिस्स केल्या आहेत, पण आता तु बरोबर असताना त्याच पार्ट्या मी खुप एन्जॉय करते आहे..” केसांची बट कानामागे सारत रोशनी म्हणाली. “हो डिअर, मी