लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १३) - अंतिम भाग'

(23)
  • 15.9k
  • 4.7k

जोसेफला जाग आली तेंव्हा त्याला जाणवले की कुठल्याश्या गाडीतुन त्याला कुठे तरी न्हेण्यात येत होते. त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते. बाहेर बर्‍यापैकी फटफटायला लागले होते. जोसेफ डोळे मिटुन अंदाज घेउ लागला. “ख्रिस, तु ह्याला मारलेस एवढे जोरात, हा मेला बिला तर नाही ना?” ख्रिस ड्रायव्हिंगसिटवर बसुन गाडी चालवत होता तर त्याच्या शेजारी बसलेला एक इसम ख्रिसला विचारत होता. “नो बड्डी.. जेंह्वा मी एखाद्याला बेशुध्द करतो तेंव्हा तो बेशुध्दच होतो. तो नक्कीच मेलेला नाही अजुन २०-२५ मिनिटांमध्ये येईल शुध्दीवर. तसेही बॉसने सांगीतले आहे की जोसेफ जिवंत पाहीजे. त्याला मरण्यापुर्वी कळायला हवे की तो का आणि कसा मरतो आहे ते..”,