स्वराज्य रक्षक संभाजी - समीक्षा, अनुभव, आभार

(33)
  • 27k
  • 2
  • 9.1k

।। स्वराज्य रक्षक संभाजी ।। दिनांक २४ सप्टेंबर २०१७, छत्रपती शिवरायांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या शुभ मुहूर्तावर चालू झालेली स्वराज्यरक्षक संभाजी मालिका काल(२९ फेब्रुवारी २०२०) संपली. याच दिवसाच्या आसपास येसूबाई महाराणी साहेब मुघलांच्या कैदेतून तब्बल तीस वर्षांनी स्वराज्यात दाखल झाल्या. (२८ फेब १७१९.) ज्यांनी ज्यांनी पहिल्यापासून मालिका पाहिली आहे, नक्कीच असा एकही माणूस नसेल की जो कालचा भाग पाहिल्यावर रडला नसेल किंवा डोळ्यांत पाणी आले नसेल! संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात शेवटपर्यंत पाहिलेली माझ्यामते ही एकमेव मालिका असेल. ते कार्टून पोगो सोडून चिल्लीपिल्लीच काय! पण सत्तर ऐंशी वर्षांचे आजोबाही एकत्र बसून मालिका पाहत होते. लहान मुलांना खेळणी सोडून ढाल