ती एक शापिता! - 6

(12)
  • 8.4k
  • 1
  • 4.4k

ती एक शापिता! (६) "चल रे, अशोक खेळायला जाऊ... कुर्रर्र!... "असे म्हणत निलेशच्या पत्नीने सुबोध-सुहासिनीच्या मुलाचे नाव ठेवले. एक छोटासा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला आलेल्या वाड्यातील पाच-सहा बायका फराळ करून गेल्याचे पाहून निलेशची पत्नी म्हणाली, "वहिनी, आमचे हे म्हणत होते की.." "काय म्हणत होते?" सुहासिनीने विचारले. "हेच की.. भाऊजीचे आणि तुमचे..." "पटत नाही. हेच ना?" "होय तेच. पण वहिनी, बायांनी असे आकांडतांडव करू नाही हो." "मग काय करावे?" "गुपचूप राहावे. घटकाभर मिळणाऱ्या सुखातच सुख मानावे. त्यांना घडी-घडी टोचू नये. अहो, दुखावलेला आणि त्यातल्या त्यात 'त्या' गोष्टीसाठी दुखावणारा माणूस जीवनातून उठतो. एखादा माणूस गळफास घ्यायला मागेपुढे पाहत नाही. काही माणसे तर..."