ती एक शापिता! - 7

(11)
  • 8.1k
  • 4.2k

ती एक शापिता! (७) नव्या विचाराने प्रेरित झालेला, नवी वाट निश्चित केलेल्या सुबोधला एकदम हायसे वाटले. त्याच्या शरीरात एक नवे चैतन्य शिरले. तो एवढा प्रफुल्लित झाला की, मलेरियाच्या आजारातून दोन दिवसातच ठणठणीत बरा झाला. एका नवीन उमेदीने तो तिसऱ्याच दिवशी कामावर परतला. कार्यालयातील त्याची उपस्थिती तशी नगण्य ठरली. कुणी त्याची साधी दखलही घेतली नाही. साहेबांची भेट घेऊन तो स्वतःच्या कामात मग्न झाला. सुहासिनी साहेबांच्या दालनात गेली परंतु नवदृष्टी स्वीकारलेल्या सुबोधला त्याचे काही वैषम्य वाटले नाही. नेहमीप्रमाणे हात जडावले नाहीत, कपाळावर आठ्यांचं जाळ घट्ट झालं नाही, चेहरा उतरला नाही की औदासिन्य पसरलं नाही. उलट त्याला कसं मोकळं मोकळं वाटलं. एक वेगळेच