ती एक शापिता! - 8

  • 6.8k
  • 2
  • 3.5k

ती एक शापिता! (८) नव्या विचाराने प्रेरित झालेला सुबोध 'योग्य' व्यक्तीचा शोध घेऊ लागला. सहचर्यात येणारांकडे, परिचितांकडे त्यादृष्टीने, त्या एकाच चष्म्याने पाहू लागला. सुरुवातीला त्याचं लक्ष वेधले ते साहेबांनी! त्याच्या लग्नाच्या वेळी साहेबांनी त्या दोघांना भेट म्हणून दिलेल्या अंगठ्याही आठवल्या. साहेबांनी स्वतःच अंगठी सुहासिनीच्या बोटात घातली होती म्हणजे त्यांनी... सुबोधच्या मनात विचारांनी गर्दी केली... 'सुहासिनीचे साहेबांशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या संबंधात मोकळेपणा, सहजता आहे. कोणताही संकोच नसल्यामुळे त्या दोघांमध्ये ते संबंध सहजपणे स्थापित होतील. त्यांना एकमेकांबद्दल जी आपुलकी आहे त्याचे रुपांतर शारीरिक आसक्तीमध्ये व्हायला वेळ लागणार नाही. सुहासिनीच्या मनात ते विचार नसतीलही परंतु साहेबांचे काय? बहुतेक अधिकारी हाताखाली काम करणाऱ्या