ती एक शापिता! - 9

  • 8.1k
  • 3
  • 3.9k

ती एक शापिता! (९) कार्यालयाच्या पत्त्यावर आलेलं ते पत्रं किसनने निलेशजवळ दिले. तो जाडजूड लिफाफा पाठवणारा सुबोध आहे हे पाहून निलेशला आश्चर्य वाटले. आत्ताच तिकडे गेलेल्या सुबोधने असे जाडजूड पत्र का पाठवले असावे या विचारात त्याने तो लिफाफा फोडला. त्या लांबलचक पत्रात सुबोधने लिहिले होते, प्रिय निलेश, माझे पत्र पाहून तुला आश्चर्य वाटले असणार कारण इथे येऊन मला फार दिवस झाले नाहीत. परंतु काही गोष्टी अशा असतात की, त्या प्रत्यक्ष सांगण्याचे धाडस माझ्याजवळ नाही. हे पत्र लिहिताना माझे हात थयथरताहेत, शब्द हजारो कोस दूर जाऊ बसले आहेत. ऑडिटर येण्यापूर्वी मी एक आगळावेगळा विचार करीत होतो पण ऑडिट प्रकरणामुळे थोडा वेळ