अघटीत - भाग ८

(29)
  • 13.4k
  • 2
  • 7.3k

अघटीत भाग ८ रात्री दहा वाजता पद्मनाभ घरी आला आल्याबरोबर ताबडतोब हात पाय धुवुन जेवण टेबलावर आला वरदाने त्याला हात पुसायला टॉवेल दिला आणि वाढायला घेतले . बरेच दिवसांनी असा तो घरी जेवायला आला होता. आजकाल उशीर झाला तर तो बाहेरच खात असे . दोघे जेवायला बसली ..”प्रिन्सेस जेवली का आमची ?त्याने विचारले . “हो रे ती आणि आई दोघीपण जेवल्या आणि झोपल्या सुद्धा .. आता गेले कित्येक दिवस तुझी माझी सुद्धा भेट होत नाहीये . मग जेवताना पद्मनाभने तिला सांगितले त्याला दोन दिवस सुट्टी मिळाली आहे तेव्हा ते सर्व कुठेतरी जाऊ शकतात खुप दिवस झाले ते सर्व असे निवांत