भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २१

  • 5.5k
  • 1
  • 1.8k

काळ्या ढगांनी सारे आभाळ भरून गेलेलं. जोराचा वारा वाहत होता. पाऊस कधीही सुरु होईल , मुसळधार पाऊस. त्यात हे सारेच एका पठारावर. त्यामुळे आणखी जोराचा वारा आला तर एखादं - दुसरा तंबू उडून जाण्याची शक्यता. मधेच विजांचा कडकडाट... काळोखी पसरलेलं आजूबाजूचे माळरान, एका क्षणात स्पष्ट दिसून जाई. एव्हाना सारेच आपापल्या तंबूत बसलेले. सुप्री अजूनही बाहेर पाहत होती. त्या ढगांचा काळा रंग .. आज जास्तच गडद आहे.. नाही का... !! सुप्री मनातल्या मनात बोलत होती. आकाशचा तंबू तिला दिसतच नव्हता. गेला असेल का आकाश बाहेर , वादळात. कि त्याच्या तंबूंत येऊन बसला असेल. किती विचार करतो आपण... कि करूच नये विचार...