भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २२

  • 5.8k
  • 1
  • 2k

कादंबरी आकाश सोबतच चालत होती. " ओ सर ... दाखवा कि फोटोग्राफी... मघाशी सांगितलं म्हणून कॅमेरा आत ठेवला मी. आता तरी दाखव ... . फोटोग्राफी... ती .. तुझी निरू ... किती काय काय सांगायची तुझ्या फोटोग्राफी बद्दल.. एकतरी फोटो काढून दाखव मला ... " आकाश कडे कॅमेरा नव्हता त्यावेळेस..." हे काय ... कॅमेरा कुठे आहे तुझा... " ," दुसऱ्या बॅगमध्ये... " ," का ... आणि फोटोग्राफी चे काय ... " आकाशला गंमत वाटली." तुझा आहे कि कॅमेरा... त्याने कर तुझी हौस पुरी... " ," चालेल ... हा घे कॅमेरा... " कादंबरीने स्वतःचा कॅमेरा पुढे केला." तुझ्याकडेच ठेव... तुला सांगतो तसे