आताही छान प्रवास झाला. संध्याकाळ होतं आली. तेव्हा आकाश एका ठिकाणी थांबला." काय झालं डब्बू ... " ," वादळ येते आहे .. थांबायला पाहिजे ... समोर बघ... " पूजाने समोर पाहिलं. ढग गोलाकार फिरत होते. अधूनमधून विजा चमकत होत्या." किती वेळ आहे आपल्याकडे ... " आकाशने घड्याळात पाहिलं." अजून एक तास तरी... पाऊस येईल का माहित नाही .. तरी तयारी करावी लागेल. " काळोख तर झालेला. आणि मोठयाने वीज कडाडली. आकाशला त्या प्रकाशात काही दिसलं. पूजाचा हात पकडला त्याने." काय झालं डब्बू .... " ...." निरू .... कदाचित आपण पोहोचलो .... तुझ्या गावात ... " पूजाही उत्सुकतेने पाहू लागली. समोर