चूक आणि माफी - 7

  • 6.7k
  • 2.6k

जत्रेचा दिवस आला .घरापुढे सारवन झाली .रांगोळ्या काढल्या गेल्या .लोकांच्या घरात पाहुण्याची वर्दळ चालू झाली . गावात नुसता आनंदीआनंद होता .निशाच्या घरी सुध्दा नुसता आनंदी आनंद होता .तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न ठरले होते . त्यामुळे तिच्या घरात आनंदाची पर्वणीच़ होती . आता आपल्या बहिणी सोबत जेवढा जास्तीत जास्त वेळ घालवता येयील तेवढा घालवावा अस निशाला वाटू लागल . त्यामुळे कुठे ही जाताना मोठ्या बहिणी सोबतच़ जात . आता नीरजाकडे तीच जण ही दुर्मिळ झाल होत . निशाच्या घरात आता लग्न आणि जत्रा दोघांची गडबड चालू होती . आणि त्या गडबडीत निशा व्यस्त झाली होती .