पॅपिलॉन - समीक्षा, माहिती, अनुभव

  • 17.7k
  • 4.4k

पॅपिलॉन वरदा प्रकाशनाचे हे पुस्तक. रवींद्र गुर्जर अनुवादित. मूळ लेखक हेन्री शॅरिअर. हा या कादंबरीचा, आत्मवृत्ताचा नायक.. एकाच वाक्यात पुस्तकाचं सारं सांगायचं म्हटलं तर, "प्रबळ आत्मविश्वास, अफाट जिद्द, जबरदस्त इच्छाशक्ती आणि बळकट शरीसंपदा यांच्या जोरावर कोणत्याही कठीण परिस्थितीवर अन कोणत्याही अडचणीवर मात करता येते." पुस्तकाच्या मागच्या पानावर पुस्तकाची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. "जबरदस्त आत्मविश्वास आणि बळकट शरीर संपदा यांच्या जोरावर एक सामान्य माणूस आयुष्यात किती अचाट आणि प्रचंड साहस करू शकतो याची हि कहाणी." "काही धोकेबाज लोकांच्या आणि भ्रष्ट पोलिसांच्या कारवाईमुळे मनुष्यवधाच्या आरोपांखाली त्याला जन्मठेपेची शिक्षा होते. पहिले यशस्वी पलायन केल्यावर रेड इंडियन लोकांसोबत घालवलेले काही सुखद महिने. त्यानंतर पुढच्या