अघटीत - भाग १४

(37)
  • 12.2k
  • 2
  • 6.3k

अघटीत भाग १४ त्या दिवशी गौतमचा मेसेज तिला मिळाला तो नुकताच परदेशातून परतला होता ,त्याने तिला घरी भेटायला बोलावले होते. क्षिप्राचे मन थरारून उठले त्याला भेटायची आस तिला होतीच . घरी बोलावले म्हणजे घरच्या लोकांशी ओळख करून देतोय वाटत ..!! असा विचार मनात येताच ती खुप आनंदली . त्याने संध्याकाळी पाच वाजता भेटायची वेळ दिली होती ,पण आज वेळेचा तिला काही प्रोब्लेम नव्हता कारण काल आई दोन दिवसासाठी सातारला गेली होती,उद्या यायची होती . आजी तर अजुन आत्याकडेच होती . साडेचारला क्षिप्रा तयार झाली . आज तिने स्लीवलेस पंजाबी घातला होता आणि ओढणी पण घेतली होती . गौतमच्या घरच्या लोकांना