अघटीत - भाग १८

(52)
  • 11.8k
  • 3
  • 5.8k

अघटीत भाग १८ दुसऱ्या दिवशी सकाळी क्षिप्राला जाग आली तेव्हा दहा वाजून गेले होते . तिचे डोके चांगलेच जड झाले होते ,बेड वरून उठायला पण कठीण जात होते . अंगदुखी ,मळमळ..काहीतरी विचित्रच वाटत होते . ती तशीच उठली आणि स्वयंपाक घरात गेली . मावशी नाश्ता तयार करून स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या होत्या. बाबा आणि आई पण केव्हाच बाहेर पडले होते . मावशीनी तिला चहा नाश्ता देऊ का विचारले...पण क्षिप्राने इतक्यात नको असे सांगितले आणि ती परत आपल्या खोलीत परतली . तिला काहीच सुचेना मग दरवाजा लावून तिने सिगारेटचे पाकीट काढले आणि सिगारेट ओढू लागली .. काल गौतमने आणलेल्या ब्रांडची सिगारेट खुप