एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 16

  • 5k
  • 1
  • 2.3k

मॅरेज अनिवर्सरीचा प्रोग्रॅम संपला होता ...अजिंक्यही बाबांसोबत झोपी गेला ..निशा आणि मृणाल सोबतच झोपणार होते ..प्रवासाने निशाला लवकरच झोप लागली पण मृणालला काही झोप लागली नव्हती ..मृणालची मानसिक स्थिती आधीच बरी नव्हती त्यात समीरच्या घृणास्पद वागण्याने ती घाबरून गेली होती ...त्याची ती नजर तिच्या समोरून जातच नव्हती ...त्याच्या नजरेत तिला हवस दिसत होती आणि ती हवस मिटविण्यासाठी तो काहीही करू शकत होता ..हीच हवस तिने मुंबईला असताना सर्वांच्या डोळ्यात पाहिली होती आणि तीच स्थिती बऱ्याच वर्षानंतर आल्याने ती अवघडून गेली ..रात्रीच्या अंधारात देखील तिला तोच तो दिसत होता ..आजूबाजूला सर्विकडे आज तोच तो होता ..तिच्या मेंदूवर त्याने अधिराज्य स्थापन