प्रत्येक रात्रीला पडणारा अंधार मृणालच्या आयुष्यात दुःख घेऊन येत होता . रात्री झोप तिला कदाचीतच यायची ..संपूर्ण जग झोपी गेल्यानंतर मृणाल मात्र रात्र नि रात्र भिंतीकडे पाहत असायची ..तिची स्वताची एक काल्पनिक दुनिया बनली ज्यात तिला नको ते विचार यायचे .त्या विचारात ती स्वताच हरवली जायची..कधी कधी ती वेड्यासारखं वागून जायची आणि संपूर्ण जग त्या वेडेपणावर हसत आहे असा भास तिला होऊ लागला ....अशाही स्थितीत समीरने तिच्या आयुष्यात येऊन पुन्हा दुःखांची नवीन शृंखला उभी केली ..त्याच्या अप्रिय विचारनी मृणालची झोप उडाली होती ..पण आज मृणाल एकटीच नव्हती जी झोपली नव्हती तर बाजूच्याच घरी समीरदेखील जागत होता ..समीर सिगारेटवर सिगारेट