एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 23

  • 4.9k
  • 1
  • 2.4k

अजिंक्यने प्रज्ञाला बंदिस्त करू नको अस नक्कीच सांगितलं होतं पण आईच काळीज काही मानेना आणि तिने गुपचूप आपला तोच प्रवास सुरु ठेवला ..तिला कोणत्याही स्थितीत प्रज्ञाला गमवायचं नव्हतं त्यामुळे ती तिची ढाल बनून प्रज्ञाच्या सभोवती राहू लागली ..प्रज्ञाला कुणी काही बोलल तरी मृणाल त्यांची चांगलीच खबर घेत होती ..प्रज्ञाही आईसोबत फार खुश राहू लागली ..ती याबद्दल सहसा अजिंक्यला काहीच सांगत नसे पण अजिंक्य अचानक तिच्या आधी घरी आला की मग मात्र मृणाल पेचात सापडायची ..ती त्या रात्री अजिंक्यशी बोलणंच टाळत असे आणि अजिंक्य तिला अस पाहून रागवायच्या ऐवजी मनातल्या मनात हसून तिची गंमत घेण्यात समाधान मानायचा ..ती जरी