अजिंक्य गेल्यानंतर मृणालचा चेहरा आज पहिल्यांदाच एवढा खुलला होता ..अजिंक्य ज्या प्रेमासाठी सर्वांशी भांडला होता ते प्रेम शेवटी जिंकलच ,..पुन्हा एक अजिंक्य त्यांच्याच घरी जन्माला आला होता ..जो पुन्हा आपल्या प्रेमासाठी जगाशी भांडणार होता ..हा विचार तिच्या मनात येताच अंगात सरसरी निर्माण झाली ..पण एक खंत मात्र मागे राहिली ती आईबाबांना शेवटच भेंटण्याची ..सुरज घरी जायला निघणार तेवढ्यात मृणाल त्याला म्हणाली , " सुरज दोन मिनिटं थांबशील ..मी पण येते ..मला आजची रात्र तिथेच घालवायची आहे .." सुरजने होकार दिला आणि ती साडी चेंज करायला आत गेली .. काही क्षणातच ते सुरजच्या गाडीने घराकडे निघाले ..जास्त काही