कादंबरी- जिवलगा भाग – १९ वा ----------------------------------------------------------------------------------------- टीम म्हटले की “व्यक्ती तितक्या प्रकृती “, आपल्या स्वभावाचे कुणी मिळाले तर या वातावरणात रहाणे सुसह्य होऊन जाते. नेहाच्या सुदैवाने .. सोनिया आणि अनिता .या दोघींशी तिचे सूर लगेच जुळले . आणि तिघींनाही जाणवले ..आपण एकमेकीला सांभाळून घेत रहाणे आपल्या हिताचे आहे”, नेहा म्हणाली ..सोनिया – तू आणि अनिता या टीम मध्ये मला सिनियर आहेत , पण, मी तुमच्यापेक्षा ज्युनियर असून ..हे पेमेंट सेक्शन मला कसे काय दिले ? काही कळले नाही बघ मला . अनिता म्हणाली ..नेहा ..हे सगळ आपल्या मेन बोसचे फंडे ..त्यांना नवे नवे प्रयोग सुचत असतात , तू इथे