आघात - एक प्रेम कथा - 3

(14)
  • 7.6k
  • 4.8k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (3) दुसऱ्या दिवशी कॉलेजात गेल्यानंतर पहिला प्रश्न? प्रशांत, सुमैयाने तुला घरी का थांबविलं होतं? रोहनने सगळया मित्रमैत्रिणींच्याकडे एक हसरा कटाक्ष टाकत मला प्रश्न केला होता. माझ्या उत्तरासाठी सगळे आतुरलेले होते. हे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून समजत होतं. सुमैयाला तिच्या आई-वडिलांशी माझी ओळख करून द्यायची होती म्हणून थांबवून घेतलं होतं. पण वाढदिवसाचा कार्यक्रम उशिरा संपल्यामुळे मलाही तिथे वेळ झाला. तिच्या घरच्यांच्या आग्रहाखातर मला थांबावं लागलं. या उत्तरावर थोडेचे कोणी समाधानी होणार होते? कोणाच्याच चेहऱ्यावर समाधानाची छटा दिसत नव्हती. सारेजण संशयी नजरेने पाहिल्यासारखे पाहतहोते. त्यांना माझ्याकडून त्या दिवशी काय झालं हे काढून घ्यायचं होतं. एवढ्यात सुमैया आली.