आघात - एक प्रेम कथा - 4

  • 8k
  • 4k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (4) तिथे मी भेटू शकलो नाही. पुन्हा ते भर पावसात हॉस्टेलकडे चालत आले. त्यांनी माझ्या बॅगेवर जेवण ठेवलं आणि निघून गेले. त्यादिवशी आजोबा भेटू शकले नाहीत याचं दु:ख तर वाटलंच. पण त्या भर पावसात ते चार मैल भिजत चालत आले याची कल्पना मी त्यावेळी करू शकलो नाही. तरी आज मला त्या कल्पनेनं शहारे येतात. कारण त्यावेळी त्यांचं वय होतं ७९ वर्षे. उन्हाळयाची सुट्टी पडली की आम्ही आनंदून जायचो. उन्हाळयाच्या सुट्टीत गावी आल्यानंतर मी शेतामध्ये आजी-आजोबांना मदत करणं, जनावरांना गवत आणणं हा दररोजचा दिनक्रम ठरलेला. आजी-आजोबा यांचे चेहरे उजळून जायचे. त्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठे समाधान