आघात - एक प्रेम कथा - 5

  • 7.6k
  • 3.7k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (5) पण आता तिला मी आश्चर्याचा धक्का द्यायचं ठरविलं. तिच्या मैत्रिणीला शबानाला जाऊन भेटलो. पण सुमैयाला काही न सांगण्याच्या अटीवर तिला सुमैयाचं आवडतं गाणं कोणतं ते विचारून घेतलं. तिचं आवडतं गाण होतं ‘मोहब्बते’ चित्रपटातील ‘हम को हमीसे चुरालो दिल में कही तु छुपालो.’ सांस्कृतिक कार्यक्रमाचा एकदाचा दिवस उजाडला. कार्यक्रम सुरू झाला. मला ज्यांनी भाग घेण्यास विरोध केला होता त्यांना आश्चर्य वाटणं साहजिकच होतं. पण त्यांनी मला काहीच करण्याचा त्यावेळी मात्र प्रयत्न केला नाही. मी मात्र माझ्या मैत्रिणीच्या शोधात होतो. कार्यक्रम सुरु होऊन एक तास झाला तरी सुमैया आली नव्हती. डान्स शो, मिमिक्री शो, फॅशन