आघात - एक प्रेम कथा - 9

  • 5.3k
  • 2.5k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (9) पण ही गोष्ट मला कधी ना कधी तरी सांगायचीच होती. म्हणून म्हटलं सांगून टाकूया एकदाची. प्रशांत, तू एक माझा जीवाभावाचा मित्र आहेस या नात्याने मला थोडंसं तुला सूचना करावीशी वाटत आहे. हे बघ प्रशांत, तू एक गरीब कुटुंबातला,बाहेरगावी शिकण्यासाठी आलेला विद्यार्थी आहेस. तुझी आणि माझी परिस्थिती काही वेगळी नाही. पण तुला आईवडील नाहीत, मला आहेत एवढाच फरक. मला वारंवार संशय येतोय तो हाच की सुमैया तुला प्रेमपाशात ओढून फसविण्याचा अथवा तुझा जो वर्गामध्ये प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांक येतो तो येऊ नये, तुझे अभ्यासापासून लक्ष विचलित व्हावं, तू तुझ्या ध्येय उद्दिष्टांपासून दूर व्हावंस यासाठी