पार्टनर - पुस्तकानुभव

  • 26.5k
  • 13.2k

पार्टनर - पुस्तकानुभवव.पु. फक्त दोन अक्षरंच खूप आहेत यांची ओळख सांगायला. वसंत पुरुषोत्तम काळे. अवघ्या मराठी वाचकांच्या मनावर दशकानु दशके अधिराज्य गाजवणारे लेखक, कादंबरीकार, कथाकार. वपूंचं कोणतही पुस्तक घ्या, कुठूनही वाचायला सुरूवात करा. अगदी कोणत्याही वयोगटातील माणसांनी देहभान विसरून वाचावं अशी त्यांची पुस्तकं. कॉलेज मध्ये असताना आणि नंतरही वपुंच्या पुस्तकांबद्दल खूप ऐकलं होतं. पण आम्हाला इतिहासाचा नाद, त्यामुळे त्यांचं एकही पुस्तक वाचायला योग आला नाही. सुरुवातीला ऑर्कुट, नंतर फेसबुक, आता व्हाट्सऍप, इंस्टाग्राम, ट्विटर अन इतर अनेक सोशियल मीडियावर वपुंचे विचार वाचनात येतात, अजूनही येत राहतील. पुस्तक दिनाच्या निमित्ताने मेहता पब्लिकेशनच्या सेल मधून वपुंची वपुर्झा आणि पार्टनर हि दोन पुस्तके खरेदी केली