प्रिय शिव, कळत नाही कसे लिहू? आणि काय काय लिहू? पण तुझ्याशी हे बोलुही शकत नाही रे! म्हणून मनातलं सगळं कागदावर उतरून काढावसं वाटलं. तू हे वाचू शकशील की नाही, माहीत नाही! तुला हे कळेल की नाही, हे ही माहीत नाही! पण, आज तुझी खूप आठवण येतेय रे! काल, नेहमीप्रमाणे ऑफिसमधून घरी निघाले होते. हिवाळ्याचे दिवस, तरीही आभाळ भरून आलं होतं. वातावरण कुंद झालं होतं. संध्याकाळची वेळ होती. पाच साडे पाच वाजले होते. सिग्नलवर थांबले होते. नेहमीचाच सिग्नल अन त्यावर लावलेला भगवा दिसला. तेवढ्यात एक सात आठ वर्षांची मुलगी जवळ येऊन गुलाबाचं फुल देऊ लागली. "ताई, घे ना!