घुंगरू

(15)
  • 13.7k
  • 2
  • 5.1k

#@ घुंगरू@# सौ.वनिता स. भोगीलबापू घाम पुसत वाड्यात शिरले तस रत्नमाला धावत दारात आली ,तेवढ्यात माई म्हणाली आग रत्ना किती तो पायाचा आवाज..... पोरीच्या जातीला शोभत का? कस नाजूक सारख चालव...माईच्या बोलण्यानं रत्नमालाच तोंड पडल... तस बापू माईला हसून म्हणाले ,अग माई माझी रत्ना पोरगी नाही पोरगा आहे माझा, ..... तस माई म्हणाली अस बोलूनच तिला तू लाडाऊन ठेवलस रे बापू.. आतून मालती रत्नमालाची आई पाण्याचा तांब्या हातात घेऊन आली, माई बरोबर बोलता तुम्ही, दोघं बाप लेकीचं काय चालय काही समजत नाही,आणि हो हिच्या लग्नाचं काही बघायचं की नाही ?... मालती एवढं बोलून उत्तराची अपेक्षा न करताच आत निघून गेली.सखाराम बापू आणि मालती यांची एकुलती एक लाडकी