एक होता राजा…. (भाग ४)

  • 9.7k
  • 1
  • 4k

मंगेश दचकला. " अरे… हे काय… ","माझ्या engagement चे invitation… " मंगेशला धक्का बसला. निलमकडे बघत राहिला."अरे, असा काय बघतोस…जसं काही तुला माहीतच नाही.","मला कसं कळणार ? "," राजा बोलला नाही तुला… " मंगेशने नकारार्थी मान हलवली."त्याला तर पहिलच सांगितलं… आणि त्यालाच पहिलं invitation देयाचे होते म्हणून तर call करत आहे सकाळपासून." मंगेश अजून त्या धक्यातून सावरला नव्हता. "पण तुझं नशीब चांगलं आहे हा… तुला पहिलं invitation… " मंगेश खोटं खोटं हसला. " अभिनंदन… " ," Thanks… नक्की यायचे हा… " ,"हो नक्की… " मंगेश निमंत्रण पत्रिका पाहू लागला. स्वप्नील दामले…. म्हणजे ब्राम्हण… " दामले म्हणजे ब्राम्हण ना… "