रस्त्याच्या पलीकडे पसरलेल्या झोपडपट्टीत ती अन तो राहायचे. पालिकेच्या पाण्याच्या पाइपलाइनला खेटून त्यांना हक्काचे घर मिळाले होते. तो दोन गल्ल्या सोडून असलेल्या सोसायटीत हाउसकीपिंगचे काम करायचा.ती नुकतीच लग्न होऊन आली असल्याने ती दिवसभर घरीच राही.तिच्या वडिलांनी लग्नात भेट दिलेला एकुलता एक ब्ल्याक एन्ड व्हाईट टीव्ही तिच्या एकटेपणाचा सोबती होता.लग्नाला दोन महिने लोटून गेले होते, पण त्याने तिला शहर सोडा पण साधी समोरची खाऊगल्लीही दाखवली नव्हती. दिवसभर खिडकीतून खाऊगल्लीतल्या पदार्थांचे रुचकर वास येत.कधी कच्छी डबल रोटीला बटर लागे,मग तव्यावरला त्याचा वितळता वास तिला बेचैन करी;बारीक चिरलेल्या कांद्याचा,कोथिंबिरीचा झिनझिनता,भज्ज्यांचा तेलकट,बटाटावड्यांचा उग्र खमंग,रगड्याचा तिखट असे शंभर प्रकारचे वास तिला मोहवून टाकत.दिवस सरता