ती एक शापिता! - 12

(11)
  • 6.9k
  • 3.5k

ती एक शापिता! (१२) अशोक दहाव्या वर्गात शिकणारा एक युवक! वय झाले म्हणून त्याला युवक म्हणायचं नाही तर त्याची शरीरयष्टी एकदम कृश! नुसताच ताडासारखा वाढलेला. खायला भरपूर असूनही शरीर म्हणावे तसे भरलेच नव्हते. थोडेसे काम केले तरी त्याला धाप लागायची. अभ्यासात मात्र तो भलताच हुशार होता. त्याचे शिक्षक नेहमी म्हणायचे की, अशोक नक्कीच शाळेचे नाव काढणार आहे. मॅट्रिकला तो पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये येईल. त्याच्या प्रकृतीची काळजी असलेल्या सुबोध - सुहासिनीला त्याची अभ्यासातील प्रगती पाहून आनंद वाटत असे. पीयूष अशोकप्रमाणे हुशार नसला तरीही विविध स्पर्धांमध्ये तो बक्षिसे मिळवित असे. आशा आठव्या वर्गात शिकत असली तरी वयाच्या मानाने बरीच थोराड वाटत असे.