मेहंदीच्या पानावर (भाग-१)

(33)
  • 15.9k
  • 4
  • 6.6k

२४ डिसेंबर आज स्टुडीओ मध्ये आशु जोऱ्रात ओरडलीच “अग्गं हात सोडं.. कित्ती जोरात दाबती आहेस..” त्याला कारणही तस्सच होतं ‘राज’ स्ट्युडीओ मध्ये अचानकपणे आला होता, त्याचे आज रेकॉर्डींग नसताना त्याचे अनपेक्षीतपणे येणं त्याला अनपेक्षीतपणे बघणं माझ्यासाठी एक सुखःद धक्काच होता. त्याचे थोडीशी निळसर छटा असलेले डोळे, नेहमीच चेहऱ्यावर असणारी ति स्माईल, आपल्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य पसरवणारी त्याची बोलताना डोळे मिचकावुन बोलण्याची पध्दत आणि कष्टाने कमावलेली शरीरयष्टी सर्वच काही छान होते.. मी पुर्ण फिदा होते त्याच्यावर. आणि त्याचा आवाज.. माय गॉड.. अंगावर हजारो गुलाबाच्या पाकळ्यांची बरसात केल्यासारखे वाटते. उगाच नाही तो आघाडीचा गायक आहे, मीच काय कित्तेक मुली त्याच्यावर फिदा असतील.