प्रेम असे ही (भाग 2)

(30)
  • 10.9k
  • 6.5k

मागील भागावरून पुढे....... आरती घरी आली तेच मोठा विजय झाला त्या अभिर्भावात.. तिचा प्रसन्न चेहरा... बघूनच बाबा काय ते समजून गेले... " बाबा मला जॉब मिळाला..." ती घरात शिरल्या शिरल्या म्हणाली.. " अरे वाह.... अग ऐकलेस का ? " बाबा नी आईला हाक मारली. " देवा जवळ साखर ठेव... आरतीला जॉब मिळाला आहे.. "" अग बाई खरंच की काय ? " आई चकित झाली.. कारण काल रात्री दोघींचा विषय झाला होता.. त्यात तिचे शिक्षण, अनुभव नसणे वैगरे बघून दोघीनाही अजिबातशक्यता वाटत नव्हती. पण कॉल आलाय म्हणून ती गेली होती तेव्हडाच इंटरव्यू चा अनुभव म्हणून... पण लकीली तिला हा जॉब मिळाला होता. आणी त्यात त्या करण