ट्रेन दुपारच्या तीनची वेळ सूर्य भलताच तापला होता .ऑफिसमध्ये भयाण शांतता पसरली होती. मॅनेजर त्याच्या केबिनमधून अधूनमधून काचे मधुन बाहेर नजर भिरकावत होता .अचानक मोबाईल वाजू लागला. सूरज थोडा बाजूला येऊन बोलू लागला. सूरज तसा दिसायला सावळा जेमतेम उंची असलेला एक सत्तावीस वर्षाचा तरुण. पलीकडून सागर उत्सुकतेने विचारतो, "सूरज कुठे आहेस? तुला ठाऊक आहे ना ,आज आपल्याला निघायच् आहे नागपूरला? झाली का तयारी?" खरतर सूरज च्या लक्ष्यात नसते कि आज निघायचे आहे . त्याने उद्या निघायचे आहे असे गृहित धरलेले असते . 6:15 ला ट्रेन पुणे स्टेशनवरून निघणार असते. आता कसे पोहोचायचे याचा विचार करत शिफ्ट संपवून तो 3:05 ला ऑफिस