ती एक शापिता! - 14

  • 8k
  • 3.6k

ती एक शापिता! (१४) आशाला जाग आली. तिने शेजारी बघितले. अमर शांत झोपला होता. नेहमीप्रमाणे त्याला मिठीत घेऊन प्रणयाचे रंग उधळण्याची इच्छा तिला झाली नाही. का कोण जाणे पण अचानक तिचे डोळे भरुन आले. तसा प्रकार तिच्या जीवनात फारसा कधी घडला नव्हता. तिचे डोळे सहसा भरून येत नसत. तिला प्रकर्षाने माहेरची आठवण आली. आई-बाबा, दादाला भेटावे अशी इच्छा अनावर झाली परंतु वास्तव लक्षात येताच तिला भरून आले. इतर मुलींप्रमाणे आठवण येताच माहेरी धाव घ्यावी अशी तिची परिस्थिती नव्हती. अमरसोबत लग्न करून ते हक्काचे दरवाजे तिने स्वतःच बंद करून टाकले होते. एका अमरला मिळविण्यासाठी तिने अनेक जिवाभावाच्या नात्यांना, जिवाभावाच्या संबंधाला तिलांजली