ती एक शापिता! - 15

  • 5.8k
  • 3.1k

ती एक शापिता! (१५) पीयूष चालवत असलेल्या 'गवाक्ष' सदराने, लेखमालेने खूप छान प्रतिसाद मिळवला. त्याच्या गवाक्षमुळे सुजनतामत या दैनिकाचा खप दिवसेंदिवस वाढत होता. लोक सुजनतामत आणि गवाक्षची प्रतिक्षा करायचे. एकदा का अंक हातात पडला की, गवाक्ष सदर असलेले पान अगोदर हातात पडावं म्हणून घरातील स्त्री-पुरुष सारे टपलेले असायचे. एवढे ते सदर लोकप्रिय झाले होते. कारण ते सदर विनोदी तर होतेच शिवाय कुणाचा ना कुणाचा पर्दाफाश करणारे असे. मार्मिक भाषेसोबतच विनोदाची, खुसखुशीत शब्दांची झालर अनेकांना आवडायची. पीयूषकडे रोज प्रशंसा करणारी अनेक पत्रं यायची. साहजिकच लोकप्रियता वाढल्यामुळे पीयूषचा उत्साह वाढला तसाच अंकाचा खप वाढल्यामुळे मालकही पीयूषवर खुश होते. दर महिन्याला पगारासोबत पीयूषला