डॉमिनंट - 2

  • 10k
  • 4.8k

डॉमिनंट भाग दोन भाग एकपासून पुढे.... "हम्म्..." ....................... "वो फोटोग्राफर तो अपना खासमखास है.......... हार्ड कॉपी कल तक मिल जायेगी.." ..................... "ठिक..." ..................... "उसकी फिक्र छोड दो.... काम लगभग पूरा होने को है....." भारदस्त आवाजात पठाणी घातलेला तो अंगणातल्या व्हरांड्यात पाठमोरा उभा राहून फोनवर कुणाशीतरी बोलत होता. शरीरयष्टीही त्याच्या आवाजाला साजेशी अशीच तगडी होती. फोनवर बोलताना त्याच्या उजव्या हातातला चांदीचा जाडजूड कडा मागून सहज दिसून येत होता. बोलणे संपताच त्याने आपल्या स्मार्टफोन वरून लगेच दुसरा नंबर डायल केला. "हॅलो..." .................... "फोटोग्राफर को पैसा देकर निकलने बोल... और उसको कलकी डिलीव्हरी का याद दिला दे..." ........................... "हा उसका भी काम हो