हार्टब्रोकन गर उसको चाहना खता है मेरी फिर शौक से तू सजा दे... रुलाने से पहले इस दिल को और खता करने कि रजा दे... नानासाहेब पाटील nanasaheb.writer@gmail.com प्रकरण १ भर दुपारी रणरणत्या उन्हात दाट वस्तीततल्या गल्ली बोळातून विषण्ण मनाने खाली मान घालून पाय ओढत तो जात होता. साडेपाच फुटाच्या आतबाहेर उंची, साधारण शरीरयष्टी, सावळा रंग, केस विस्कटलेले, किमान पंधरा दिवसांची वाढलेली दाढी, डाव्या मनगटावर एम.आय.चं स्मार्ट बँड वॉच, पिवळ्या रंगाचा चुरगळलेला टीशर्ट, रेग्यूलर मेन्स डार्क ब्लू जीन्स, पायात अडकवलेल्या लाल रंगाच्या लोफर शूज मधल्या त्या तरुणाला शहराच्या गर्दीपासून