डॉमिनंट भाग चार डॉमिनंट भाग तीनपासून पुढे.... शहराच्या एका बाजूला असलेल्या खडकपाड्यासारख्या पॉश ठिकाणी नव्यानेच बांधलेल्या मनोरा टॉवरमधल्या एका फ्लॅटमध्ये भरदिवसा काळोखी पसरली होती. तसा तो फ्लॅट सातव्या मजल्यावर असून बिल्डिंगच्या आसपास मोकळेच होते, त्यामुळे प्रकाश आणि हवा येण्यासही चांगलाच वाव होता. परंतु तरीही त्या फ्लॅटच्या सर्व काचाखिडक्या बंद अवस्थेत होत्या. फ्लॅट तसा बर्यापैकी ऐसपैस होता. हॉलची सजावट आणि सामानही जेमतेमच होते. मेन डोअरला लागून असलेल्या भिंतीवर टांगलेल्या अडतीस ईंची एल् सी डी वर मौसमच्या खुनाची इत्यंभूत माहीती मीठमसाल्यासह विश्लेषित करून दाखवली जात होती. काही वेळा अगोदर टेबलवर ठेवलेले गरमगरम ब्रेडटोस्ट आता थोडेसे थंड पडू लागले होते. मस्तकावर प्रचंड ताण