ती एक शापिता! - 17

  • 7k
  • 1
  • 3.4k

ती एक शापिता! (१७) "ये बस! अशोक, आत्ताच पालकमंत्र्यांकडून आलोय. उद्या सारी छपाईची यंत्रे येत आहेत. येत्या पंधरा दिवसात पहिला अंक बाहेर पडणार आहे. मीता, चहा कर ना." पीयूष आनंदी आवाजात म्हणाला. "हो. करते..." असे म्हणत मीता आत गेली. "काय म्हणाले पालकमंत्री?" अशोकने विचारले. "काही विशेष नाही. सध्या तरी सारे अधिकार, वर्तमानपत्राची सारी सुत्रं माझ्याकडेच सोपविली आहेत." "व्वा! छान! एकंदरीत तुझ्या मनासारखे होतंय तर. आता तुला तुझे विचार हवे तसे मांडता येतील." "बरोबर आहे. आता तू बघ. असे एकेकाचे पितळ उघडे पाडतो ना बघच तू. राजकारणी, अधिकारी यांची भ्रष्टाचाराची पाळंमुळं उघडी पाडून यांना नाही खडी फोडायला पाठवले तर..." "त्यांना खडी