डॉमिनंट - 6

  • 7.9k
  • 3.3k

डॉमिनंट भाग सहा डॉमिनंट भाग पाचपासून पुढे.... 'किती कमी वेळात मंदारबाबतचे गैरसमज दूर झाले आणि किती पटकन त्या नाजूक क्षणापर्यंत आपण त्याच्यासोबत गेलो.. त्याची पर्सनॅलिटी बाकी आपल्याला साजेशी अशीच आहे.. उंच, मजबूत बांध्याचा.. बिनधास्त.. कसल्याही प्रसंगाला न घाबरणारा.. निडर.. असाच तर जोडीदार हवा होता मला.. छ्या.. माझ्यात मुळी टिपीकल बायकांसारखे लटकेझटके नाहीत.. बाईलचाळे करत मला तर धड लाजताही येत नाही.. नाहीतर त्याला आजच माझ्या प्रेमात वेडं केलं असतं..' मनू आपल्याच मनाशी संवाद साधत होती. मुळात धाकडशाहीसारखा स्वभाव असल्याने तिनं कधी असल्या गोष्टींवर फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण आज त्याच्यातल्या पुरूषानं तिच्यातल्या बाईला जागं केलं होतं. जीवनात अशी वेळ एकदातरी येतेच