मीनाकुमारी की बेटी?

  • 9.3k
  • 3.1k

मीनाकुमारी की बेटी? एकदा लाहोरच्या गल्लीतील एका फुटपाथवर एक चोपडे एकाच्या नजरेस पडले. घरी आल्यावर ते फाटके पुस्तक चाळून 'काहीच्या बाही लोक लिहितात' असे मनात म्हणत ते पुस्तक रद्दीत टाकून दिले. रद्दी विकताना ते पुस्तक वाचायची इच्छा झाली म्हणून तो वाचायला लागला. खरे कि खोटे याची शहानिशा करण्यासाठी त्याने शोध घ्यायला सुरवात केली. नंतर जे समोर आले ते तो सादर करत आहे. सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मीनाकुमारीची जीवन कहाणी लेखी स्वरूपात उपलब्ध आहे. माहजबीन नावाने जन्मलेली अलिबक्षची ती मुलगी. अलिबक्ष सध्याच्या पाकिस्तान मधील सरगोधा जवळच्या बेरा गावातला. बलराज सहानी पण तिथलाच असे म्हणतात. गाण्याच्या नादामुळे तो बंबईत आला. पुष्पावती नामक सहकलाकाराशी