बाबांची डेट

  • 4k
  • 1.5k

बाबांची डेट "सई अगं आवर ना लवकर ... बाबांना सोडल्यावर मला ऑफिसला पण जायचं आहे ... दोन तीन दिवसांपासून रोज उशीर होतोय... बॉस जाम चिडलाय माझ्यावर", शिरीष बुटाची लेस बांधीत काहीसा चिडून म्हणाला. "हो रे बाबा करतेच आहे ना मी... बघतो आहेस ना ? दहा हात नाहीयेत मला", सईने पण आपला राग व्यक्त केला. "बाबा तुमचं आवरलं का ? चला लवकर तुम्हाला बँकेत सोडतो... नंतर मला ऑफिसला पण जायचं आहे... पेन्शन घेतल्यावर तुम्हीं या मग रिक्षाने" "शिरीष ... तू जा ऑफिसला, मी जाईल नंतर सावकाश" "नको नको, चला माझ्या बरोबर ... नंतर बँकेत खूप गर्दी