आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (14) ऑफिसमध्ये जाताच आजोबांनी प्राचार्यांचे पाय धरले आणि रडू लागले. प्राचार्यांना विनवण्या करू लागले. ‘‘साहेब, बिनं आईबाचं पोर हाय. ह्याला लहानपणापासून मोठ्या कष्टानं आम्ही सांभाळलंय. आमचं हातावरचं पोट आहे. साहेब पोराला कॉलेजमध्ये घ्या. माझ्या पोरावर माझा विश्वास हाय. साहेब पोरं तसं वागणार नाही.’’ ‘‘माझ्याकडं बघून साहेब पोराला कॉलेजात घ्या, साहेब.’’ ‘‘हे बघा, आजोबा तु चा नातू सर्वात हुशार विद्यार्थी आहे. त्याचं वागणंही चांगलं आह. पण या प्रकरणामध्ये तो सापडल्यामुळे तो पूर्णपणे आमच्या मनातून उतरलेला आहे.’’ ‘‘साहेब आसं बोलू नका. माझ्या नातवावर इश्वास ठेवा.” ‘‘अहो, आजोबा कसा विश्वास ठेवणार. ज्यांनी तपास केलाय ती लोक खोटं