ती एक शापिता! - 19

  • 7k
  • 3.2k

ती एक शापिता! (१९) सुबोध-सुहासिनी कार्यालयातून परतले. हातपाय धुऊन सुहासिनी चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. सुबोध खुर्चीत बसून वर्तमानपत्र चाळत असताना सुहासिनी चहाचे कप घेऊन आली. सुबोधने वर्तमानपत्र बाजूला ठेवले. चहाचा कप घेताना सुबोधने विचारले, "माधवीचा चहा..." "आता तेच बाकी आहे. सुनेच्या पुढे पुढे करायचे. या वयात कार्यालयात काम, घरी आले की, घरकाम करून सुनेचेही कामे करते. वाढलेले ताट तिच्यापुढे ठेवते आणि तिचे उष्टेही काढते..." "काही कळत नाही, माधवी अशी का वागते? आपले सोड पण त्या दोघांमध्ये कधी हसणं-खेळणे, रुसणं-फुगणं दिसत नाही. शेजाऱ्यांप्रमाणे दोघे समोरासमोर बसतात, एका खोलीत झोपतात. वास्तविक या वयात दोघांनी कसं..." "त्यांचंही आपल्यासारखेच आहे असे वाटते." "म्हणजे?"