मेहंदीच्या पानावर (भाग-८ शेवटचा)

(57)
  • 13.5k
  • 2
  • 4.4k

२६ मार्चगेल्या दोन चार दिवसांत विशेष असे काही घडले नाही. स्टुडीओमध्ये राज दिसतो, पण त्याच्या चेहर्‍यावर मला माझ्यासाठी काळजीच दिसली आणि जी मला आज्जीब्बात आवडली नाही. मला अशी कोणी किव केलेली आज्जीब्बात आवडत नाही. कदाचीत ’तु नही तो और सही’ नाही म्हणता येणार मला, पण म्हणुन मला इतकं नको रे लाचार करुन टाकुस की आरश्यासमोर उभे राहील्यावर माझ्याच नजरेला मी नजर नाही देऊ शकणार! २७ मार्चटळटळीत दुपारी खिडकीतुन खाली बघत बसले होते. निष्पर्ण झालेली झाडं, पानगळतीमुळे कचरामय झालेले रस्ते, तुरळक वाहतुकीत वेगाने जाणार्‍या वाहनांच्या मागोमाग उडणारी धुळ आणि पानांची रांग, जागो जागी दिसणारे उसाच्या रसांची गुर्‍हाळ उन्हाळ्याची चाहुल देत