डॉमिनंट - 10

  • 6.7k
  • 1
  • 3.1k

डॉमिनंट भाग दहा डॉमिनंट भाग नऊपासून पुढे.... पोलिसांच्या जीप निघाली आणि थंडगार वार्याच्या झुळकीमुळे अगोदरच घायाळ झालेला मंदार थकून आपले सर्वांग सैल सोडून भूतकाळ आठवू लागला. विक्रमचे त्याच्या गावात येणं, त्याच्याशी झालेली दोस्ती.. विक्रमची श्रीमंती आणि रूबाब यांनी तर मंदारवर सुरुवातीपासूनच भुरळ घातली होती. त्यात समाजसेवेच्या नावाखाली असलेले विक्रमचे काळेधंदे मंदारला माहीत पडले होते. शिवाय गावोगावी स्त्रीयांच्यासाठी चालवण्यात येणार्या एन् जी ओ ला मिळणार्या पैश्यात विक्रमचा हिस्सा ठरलेला असायचा. या सर्व बाबींचा जाब मंदारने विक्रमसमोर बेधडकपणे विचारला होता. मुळात निडर असलेला मंदार म्हणजे विक्रमसाठी एक आयतीच संधी होती. त्याने शांत डोक्याने मंदारला पैसा दाखवत आपल्या बाजूने वळवून घेतले होते. मग